
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी पुठे आहेत? ते पुठून आले? हे प्रश्न शिवसेना देशात उपस्थित करत राहील, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांच्या यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना म्हणाले. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत शिवसेना कधीच राजकारण करणार नाही, या मुद्द्यावर सर्व पक्ष एकजूट आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कराच्या तीनही दलांनी यशस्वी कामगिरी केली. त्यांना शिवसेना सलाम करते. पण पिक्चर अभी बाकी है असे संरक्षणमंत्री व इतरांनी म्हटले होते, त्याचीच आम्ही वाट पाहतोय, पाकिस्तानात घुसून आपण पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवणे गरजेचे आहे, दहशतवाद्यांचे सर्व तळ उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. चीनच्या घुसखोरीबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही ते म्हणाले.