शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार, 21 ऑगस्ट व गुरुवार, 22 ऑगस्ट असे दोन दिवस महाराष्ट्र स्वाभिमान सभेनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाशिक, मनमाड येथे ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असून येवला येथे शेतकरी मेळावा होणार आहे.
नाशिक शहरात बुधवारी, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे. येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र स्वाभिमान सभेनिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता मनमाडच्या सगळे लॉन्स येथे होणाऱ्या सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.