तुमच्या घरावर बुलडोझर आला तर आधी आम्ही समोर उभे राहू! आदित्य ठाकरे यांचा लोकमान्यनगरमधील रहिवाशांना आधार

तुम्ही काळजी करू नका. आम्ही भक्कमपणे तुमच्यासोबत आहोत. जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढायचे आहे. इथे राजकीय विचारसरणी महत्त्वाची नाही, तर जेव्हा आपले घर हातातून निघून जाते, तेव्हा आपण कोणाला मतदान केले, कोणासाठी आंदोलन केले हे बुलडोझर बघत नाही. त्यामुळे आता आपल्याला एकी दाखवायची आहे. जर त्यांनी तुमच्या घरांवर बुलडोझर आणला, तर आम्ही आधी तिथे समोर उभे राहू. तुमच्या आणि बुलडोझरच्या मध्ये शिवसेना उभी राहील,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेतेयुवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकमान्यनगरमधील रहिवाशांना आधार दिला.

लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा आवडता बिल्डर लादला जात असल्याने याविरोधात येथील रहिवाशी आक्रमक झाले आहेत. शनिवारी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी येथील स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ असा आधार त्यांना दिला. तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचा, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, जाती-धर्मावरून आगी लावण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही एकजूट ठेवली तर कोणीही तुम्हाला हात लावायला येणार नाही. आमचा स्वतःचा यात कोणताही हेतू पिंवा अजेंडा नाही. तुम्ही जे ठरवाल, त्यात मी तुमच्यासोबत आहे,’ असा विश्वास आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. तुमच्यामध्ये भांडणे लावण्याचा, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, जाती-धर्मावरून आगी लावण्याचा प्रयत्न होईल; तुम्ही हे होऊ देऊ नका. तुम्ही एकजूट ठेवली तर कोणीही तुम्हाला हात लावायला येणार नाही. आमचा स्वतःचा यात कोणताही हेतू पिंवा अजेंडा नाही. तुम्ही जे ठरवाल, त्यात मी तुमच्यासोबत आहे,’ असा विश्वास आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख-आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, प्रशांत बधे, लोकमान्यनगर बचाव कृती समितीचे अॅड. गणेश सातपुते आदी उपस्थित होते.

पुण्यात जगातलं कदाचित एकमेव उदाहरण आहे की, नदीचं पात्र खोल करण्याऐवजी ते अरुंद केलं जातंय. जिथे रुंदीकरण व्हायला हवं, तिथे नदी छोटी केली जातेय, टेकडय़ा पह्डल्या जाताहेत आणि हा विनाश ‘विकास’ म्हणून दाखवला जात आहे. विकासाच्या नावाखाली पुणे शहराचा विनाश केला जात आहे.

जर आम्हाला फक्त सत्तेची, खुर्चीची पिंवा सीट्सची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो,’ असे स्पष्ट
करीत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आमचं राजकारण सत्ताकेंद्रित नाही, तर मूल्यांवर आधारित आहे. पर्यावरण आणि लोकांची
सुरक्षितता या गोष्टी आमच्यासाठी नॉन-निगोशिएबल आहेत.