
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात मोठा गदारोळ सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरात हिंसण वळण लागले आहे. बुधवारी संध्याकाळी आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात अनेक विद्यार्था जखमी झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील हिंदुस्थानच्या दूतावासाने तेथील हिंदुस्थानी नागरीकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
हिंदुस्थानी दूतावासाने एक अॅडव्हायजरी जारी करत हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडण्याचा आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कोणत्याही हिंदुस्थानी नागरीकाला आपत्कालीन मदतीची गरज भासल्यास तात्काळ दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकात केले आहे. तसेच संपर्क करण्यासाठी क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा –
1. हिंदुस्थानचे उच्चायुक्त, ढाका ः +880-1937400591
2. हिंदुस्थानचे सहाय्यक उच्चायुक्त, चटगाव ः +880-1814654797/ +880-1814654799
3. हिंदुस्थानचे सहाय्यक उच्चायुक्त, राजशाही ः +880-1788148696
4. हिंदुस्थानचे सहाय्यक उच्चायुक्त, सिलहट ः +880-1313076411
5. हिंदुस्थानचे सहाय्यक उच्चायुक्त, खुलना ः +880-1812817799