
वकिलांच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणुकीसाठी आज शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अॅड. नितीश सोनवणे यांना वकिलांनी मोठय़ा संख्येने पाठिंबा दर्शवला तसेच प्रथम पसंतीचे मत देऊन बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. आजपर्यंत मॅजिस्ट्रेट कोर्ट बारमधून कोणताही प्रतिनिधी बार कौन्सिलवर सदस्य म्हणून निवडून न गेल्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टातील वकील सभासदांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळ बार कौन्सिलमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टचा सक्षम आणि विश्वासार्ह प्रतिनिधी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत येथील वकिलांनी मांडले. वकिलांवर होणाऱया हल्ल्यांबाबत अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट पास होण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. तसेच सतत वकिलांच्या हितासाठी धडपडणाऱया अॅड. सोनवणे यांचे वकिलांनी कौतुक केले.



























































