
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिंदुस्थान व अफगाणिस्तान यांच्यामध्ये १४ जूनपासून बंगळुरू येथे होणाऱया एकमेव कसोटीसाठी अफगाणिस्तान क्रिकेट निवड समितीने मंगळवारी आपल्या संघाची घोषणा केली. यामध्ये चार फिरकी गोलंदाजांना अफगाणिस्तानच्या संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये आयपीएलमध्ये चमक दाखवणारा लेगस्पिनर रशीद खान, मुजीब रहमान, झहीर खान, अमीर होताक यांचा समावेश आहे. तसेच फलंदाजीची जबाबदारी अशगर स्टॅनिकझाय, मोहम्मद नाबी, मोहम्मद शहजाद यांच्यावर अवलंबून असेल.
राष्ट्राध्यक्षांनंतर मीच जास्त प्रसिद्ध – रशीद खान
‘आयपीएल’मधील उपांत्य लढतीत सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानने कोलकाता नाइट रायडर्सकिरोधात केलेल्या कामगिरीचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले. सचिनने केलेल्या कौतुकामुळे रशीद खान अफगाणिस्तानात प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. राष्ट्राध्यक्षांनंतर सर्कांत जास्त प्रसिद्ध कोण असेल तर तो मी आहे असे रशीद आता अभिमानाने सांगू लागला आहे.
अफगाणिस्तानचा चमू –
- अशगर स्टॅनिकझाय,
- मोहम्मद शहजाद,
- जावेद अहमदी,
- रहमत शाह,
- इहसानुल्लाह जानत,
- नासीर जमाल,
- हाशमतुल्लाह शाहीदी,
- अफसार झझाय,
- मोहम्मद नाबी,
- रशीद खान,
- झहीर खान,
- अमीर होताक,
- सय्यद अहमद,
- यामीन वफादार,
- मुजीब रहमान.
सचिनच्या ट्विटने रशीद खान सुपरहिट
‘आयपीएल’मध्ये रशीद खानने जबरदस्त कामगिरी करून क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरने ट्विटरवर रशीद खानच्या खेळाचे कौतुक केले. या कौतुकानंतर रशीद खान अफगाणिस्तानमध्ये आणखी सुपरहिट झाला. सचिनने आपल्या ट्विटरमध्ये लिहिले होते की, ‘मला नेहमीच रशीद चांगला फिरकी गोलंदाज आहे असं वाटत होतं आणि आता ‘टी-२०’ फॉरमॅटमधील तो सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे असं म्हणताना मला संकोच नाही. त्याच्याकडे फलंदाजी कौशल्यही आहे.’


























































