ICC T20 WC 2026 – अफगाणिस्तानचा विजयी शेवट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इब्राहिम झदरानच्या 56 चेंडूंतील 95 धावांच्या अभेद्य खेळीने अफगाणिस्तानचा टी-20 वर्ल्ड कप अभियानाचा शेवट विजयी केला. अफगाणिस्तानने 4 बाद 200 अशी मजल मारल्यानंतर मोहम्मद नबीने अवघ्या 7 धावांत 4 विकेट घेत पॅनडाला 118 धावांवर रोखत 82 धावांनी विजय नोंदवला. सामनावीर झदराने आपल्या खेळीत 5 षटकार आणि 7 चौकार खेचले तर सेदिकुल्लाह अटलने 44 धावा काढल्या.

झदरान-अटल यांच्या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानला 200 धावांचा टप्पा गाठता आला. पॅनडाच्या जस्करन सिंगने 52 धावांत 3 विकेट टिपले. तो सर्वात महागडला आणि यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पॅनडाला 201 धावांचा पाठलाग करणे शक्य नसल्याचे सलामीवीरांच्या फलंदाजीतून दिसून आले. गेल्या सामन्यात शतक ठोकणारा युवराज सामरा 17 धावांवरच बाद झाला. त्यानंतर त्यांचा एकही फलंदाज अफगाणी माऱयासमोर तग धरू शकला नाही. त्यानी धावांचा पाठलाग करण्याऐवजी 20 षटके खेळून काढण्यातच धन्यता मानली. हर्ष ठाकरने 24 चेंडूंत सर्वाधिक 30 धावा केल्या. मोहम्मद नबीने किफायतशीर गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 7 धावा देत 4 फलंदाज टिपले.