
एआयमुळे अनेक कंपन्या आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकत आहेत. ओरॅकल कंपनीने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानातील 12 हजार कर्मचाऱ्यांना आणि जगभरात 30 हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. यात एका बंगळुरूमधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हा कर्मचारी ओरॅकलमध्ये 14 वर्षांपासून प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. तसेच त्याला तब्बल 48 लाखांचे वार्षिक पॅकेज होते. कामावरून काढून टाकताना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही किंवा फोन कॉल केला नाही. केवळ एक ऑटोमटेड एचआरचा ई-मेल आला आणि उद्यापासून कामावर येण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले. म्हणजे अवघ्या काही सेकंदांत या कर्मचाऱयाची नोकरी गेली. या कर्मचाऱयाने नुकतेच आपल्या वृद्ध आई-वडिलांना बंगळुरूला आणले होते. बंगळुरूमध्ये तो 85 हजार घरभाडे भरत होता. परंतु एका ई-मेलने या कर्मचाऱयाला शून्यावर आणले.

























































