बिहार पाठोपाठ संपूर्ण देशात लागू होणार SIR, दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी SIR (एसआयआर) संदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. की देशभरात हे एकाच वेळी SIR लागू केले जाईल. यासाठी 10 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत मोठी बैठक होणार आहे. भारतीय नागरिकांना SIR मध्ये समाविष्ट करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांविषयीही आयोगाने सूचना मागविल्या आहेत.

पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यमान मतदारांची संख्या, मागील SIR ची तारीख व डेटा, डिजिटायझेशनची स्थिती यासह एकूण 10 मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आली आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व एकूण केंद्रांची संख्या यावरही अहवाल द्यावा लागणार आहे. अधिकारी आणि बूथ लेव्हल ऑफिसर्स यांच्या नियुक्ती व प्रशिक्षणाच्या स्थितीवरही प्रेझेंटेशनमध्ये भर देण्यात येईल. बिहारमध्ये SIR ची प्रक्रिया सुरू असून ती 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

आयोगाने देशभरात हे लागू करण्याची अधिकृत तारीख अजून निश्चित केलेली नाही. मात्र सूत्रांकडून संकेत मिळाले आहेत की SIR संपूर्ण देशभर एकाच वेळी लागू करण्यात येईल. SIR च्या तारखेबाबत अंतिम निर्णय 10 सप्टेंबरच्या बैठकीनंतर घेतला जाईल.