चार दशकांनी लाहोरमध्ये रावी नदी वाहू लागली

अविभाजित पंजाब प्रांताची ओळख आणि पाकिस्तानच्या लाहोर शहराची एकेकाळची जीवनवाहिनी असलेल्या रावी नदीने चार दशकांनंतर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. रावी नदीचे हक्काचे पात्र तिने पुन्हा एकदा मिळवल्यामुळे लाहोरमधील नागरिकांनी फाळणीपूर्व आठवणी दाटून आल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियावर सध्या रावीच्या ओसंडून वाहणाऱ्या पात्राची चर्चा आहे. तिचे वाहते रूप पाहण्यासाठी लाहोरमधील पुलावर लोकांनी गर्दी केलेली दिसत आहे. रावी नदीने शेवटची आंतरराष्ट्रीय सीमा 1988 साली ओलांडली होती.