गॅसनंतर बाटलीबंद पाणीही महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असतानाच बाटलीबंद पिण्याचे पाणीही महागणार आहे. पाण्याच्या बाटल्यांवरील उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून येत्या काही दिवसांत पाण्याच्या बाटल्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

प्लास्टिक बाटल्यांसाठीचा मुख्य कच्चा माल-पॉलिमरची किंमत 50 टक्के वाढून 170 रुपये प्रति किलो झाली, तर बाटलीचे झाकण किंवा पॅपची किंमत दुप्पट म्हणजे 45 रुपये प्रति युनिट झाली आहे.