Pahalgam Terror Attack – केंद्राची झोप उडाली! पंतप्रधान मोदींनी घेतला घटनेचा आढावा, अमित शहा तातडीने श्रीनगरला रवाना

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्यांनी स्वतः X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हल्ल्यानंतर फोनवरून संवाद साधत घटनेची माहिती घेतली, असंही अमित शहा आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीला गृह मंत्रालय आणि आयबीचे उच्च अधिकारी उपस्थित होते.

X वर पोस्ट करत अमित शहा म्हणाले आहेत की, “मी पंतप्रधान मोदींना जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनेची माहिती दिली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. सर्व केंद्रीय यंत्रणांसोबत गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांची तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी मी लवकरच श्रीनगरला रवाना होईन.”

ते म्हणाले, “मी लवकरच सर्व केंद्रीय यंत्रणांसोबत सुरक्षा आढावा बैठक घेण्यासाठी श्रीनगरला जात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”