नगरमध्ये 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राज्यव्यापी कार्यक्रम

राज्यामध्ये व देशांमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाचा वर्धापन दिन येथे 10 जून रोजी नगर येथे करण्याचा निर्णय घेतला असून राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी येणार असून निकालानंतर हा राज्यातील पहिलाच मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असतो तो वर्धापन दिन यंदा एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा कार्यक्रम नगर येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. तसेच निवडून आलेले सर्व खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या 10 जून रोजी नगर शहरांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.