
श्री साईबाबांवर लाखो भक्तांची अखंड श्रद्धा आहे. याच श्रद्धेच्या भावनेतून भाविक श्री साईबाबांना विविध दान अर्पण करत असतात. अशाच एका साईभक्ताने आज (09 ऑक्टोबर 2025) 74 लाख 49 हजार 393 रुपये किंमतीचे सुवर्ण ताट साईंच्या चरणी अर्पण केलं आहे.
ठाण्यातील हीर रिअल्टी व्हेंचर प्रा.लि.चे साईभक्त धरम कटारिया यांनी श्री साईचरणी 660 ग्रॅम वजनाचे आकर्षक सुवर्ण ताट अर्पण केले आहे. या सुवर्ण ताटाची किंमत 74 लाख 49 हजार 393 इतकी आहे. हे सुवर्ण ताट श्री साईबाबा संस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. श्री साईबाबांच्या चरणी सुवर्ण ताट अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्त धरम कटारिया यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.