नगर जिल्ह्यातील 10 उपजिल्हाधिकारी, 5 तहसीलदारांच्या बदल्या

काही दिवसांपासून प्रस्तावित असणाऱया महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या जिह्यातील 10 उपजिल्हाधिकारी, तर पाच तहसीलदारांचा समावेश आहे. नगर, श्रीरामपूर, शिर्डी आणि पारनेर-श्रीगोंदा या चार उपविभागीय अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत, तर श्रीरामपूर, राहता, संगमनेर तालुक्यांच्या तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची जळगावला बदली झाली असून, त्यांच्या जागेवर हेमलता बडे, नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या जागी गंगाखेडहून सुधीर पाटील, श्रीरामपूरचे अनिल पवार यांच्या जागेवर किरण सावंत पाटील येत आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या जागेवर शाहूराज मोरे, कर्जत-जामखेड प्रांताधिकारीपदी नितीन पाटील यांची बदली झाली आहे.

परभणी जिह्यातील सुधीर पाटील यांची नगरचे प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. जळगाव येथील किरण सावंत पाटील यांची श्रीरामपूरचे प्रातांधिकारीपदी बदली झाली. जयश्री माळी यांच्या जागेवर हेमलता बडे यांची बदली झाली. जितेंद्र पाटील यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. पाटील यांच्या रिक्त जागेवर जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील येत आहेत. उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील यांची श्रीवर्धन येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर नाशिकचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर हे बदलून आले. शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर वैजापूरचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांची बदली झाली. पारनेर-श्रीगोंदाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या जागी मेहकरचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांची बदली झाली.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, गोविंद शिंदे या उपजिल्हाधिकाऱयांना अद्यापि कोठेही नियुक्ती दिलेली नाही. तहसीलदार वैशाली आव्हाड यांची नाशिक येथे कुळकायदा विभागात, तर श्रीरामपूरचे प्रशांत पाटील यांची चाळीसगावचे तहसीलदार म्हणून, राहत्याचे कुंदन हिरे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आस्थापना विभागात, जिल्हा निवडणूक शाखेतील चंद्रशेखर शितोळे याची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात, संगमनेरचे अमोल निकम यांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे.

जिह्यात नव्याने आलेले तहसीलदार अमोल मोरे चाळीसगाव येथून राहता तहसीलदारपदी, अमळनेर येथून आलेले मिलिंदकुमार वाघ यांची नगर जिल्हा निवडणूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रजित राजपूत यांची राहुरीचे तहसीलदार म्हणून बदली केली. राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांची बदली अद्याप प्रतीक्षेत आहे. कर्जत-जामखेडचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबाले हे निलंबित झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर नितीन पाटील यांची बदली झाली. विशेष भूसंपादन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची माण-खटाव येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. विशेष भूसंपादन अधिकारी संदीप चव्हाण यांच्या जागेवर गौरी सावंत बदलून आल्या. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारीपदी संदीप चव्हाण काम पाहत आहेत.