
‘कृत्रिम बुद्धिमता (एआय) विकसित करताना माणसाचा मेंदू आवश्यक आहे. कंपन्यांमध्ये उत्पादन करण्यासाठी माणसांची आवश्यकता लागणार आहे. देशातील उद्योग जगतातील पहिले एआय धोरण चार महिन्यांत महाराष्ट्रमध्ये आणणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
‘नदी सुधार योजनेचा आराखडा तयार केला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि पर्यावरण विभागाने एकत्रित अडीच हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. इंद्रायणी, पवना नदी सुधारला लवकरच मुर्त स्वरूप येईल’, असे सांगून पुन्हा एकदा सामंत यांनी नागरिकांना गाजर दाखविले आहे.





























































