
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एआयचा जोरदार बोलबाला सुरू आहे. इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून दोन महिने, चार महिने, सहा महिने, एका वर्षाच्या बाळाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एआयच्या मदतीने हे व्हिडीओ तयार केले जात आहे. छोटय़ा बाळाचा एखादा पह्टो घेऊन त्याला व्हिडीओमध्ये रूपांतरित केले जात आहे. या व्हिडीओत छोटय़ा बाळाच्या तोंडून ‘गोली मार देगा मेरे को.. बड़ा चांडाल है बड़ा.. निकालेंगे बड़ा पीछे से तलवार बड़ा मुर्गा को जैसा करता है ना उससे बड़ा तेरा खचाखच करके बड़ा गर्दन मारेगा..गोली मारेगा, मेरे को मारेगा.. मेरे को गोली मारने के लिए ना पचास गुंडा होना चाहिये..’ हे शब्द पाहायला आणि ऐकायला भारी वाटत आहेत.























































