चंद्रपूर शहरवासीयांची पूरग्रस्ताना मदत

592

चंद्रपूर शहरवासीयांनी सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्ताना मदतीचा हात पुढे केला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने 5 सामाजिक संस्था यासाठी पुढे आल्या आहेत.

15 दिवस पुरेल एवढे धान्य-चादर-ब्लॅंकेट पाठविण्याची तयारी करण्यात आली असून सुमारे 750 कुटुंबांना ही मदत सामुग्री दिली जाणार आहे. बालाजी देवस्थान, विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, जैन श्वेतांबर मंदिर, जैन स्थानकवासी संघ, जैन सेवा समिती, आनंद नागरी सह. बँक आदी संस्था-संघटना यात सहभागी झाल्या आहेत. ही सामुग्री15 ऑगस्ट रोजी चंद्रपूरचे पथक सांगली जिल्हा प्रशासनाच्या हवाली करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या