एअर इंडियाला ‘बोईंग-787’ ची पुन्हा तपासणी करावी लागणार, पायलट्स असोसिएशनच्या मागणीवर डीजीसीएचा निर्णय

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) रविवारी एअर इंडियाला सर्व बोईंग 787 विमानांमधील रॅम एअर टर्बाइन (आरएटी) च्या तपासणीचे पुन्हा निर्देश दिले आहेत.

एअर इंडियाच्या दोन बोईंग 787 विमानांमधील अलीकडच्या तांत्रिक घटना आणि फेडरेशन ऑफ इंडियन पायलटने (एफआयपी)   एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांना ग्राऊंडिंग करण्याची मागणी केल्यानंतर डीजीसीएने हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विमानांचे फिटिंग आणि स्थिती पुन्हा तपासली जाईल. या विमानांचे पॉवर पंडिशनिंग मॉडय़ूल अलीकडेच बदलण्यात आले आहे तरीही या विमानांमधील रॅम एअर टर्बाइन (आरएटी) मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.  डीजीसीएने अमेरिकन विमान उत्पादक पंपनी बोईंगला अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच अशा घटनांचा सविस्तर अहवाल मागवला आहे.

अलीकडच्या आपत्कालीन घटना

4 ऑक्टोबर रोजी अमृतसर-बार्ंमगहॅम फ्लाइट एआय-117 विमान लँडिंगच्या वेळी त्यातील इर्मजन्सी सिस्टम ऑक्टिव झाले.  त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी व्हिएन्नाहून दिल्लीला जाणारे फ्लाइट एआय-154 तांत्रिक समस्येमुळे आणि ऑटोपायलट सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे दुबईला वळवावे लागले.

10 ऑक्टोबर रोजी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स संघटनेने नागरी उड्डयन महासंचालनालयाला सर्व एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर विमाने ग्राऊंड करण्याची विनंती केली, त्यांच्या विद्युत प्रणालींची तपासणी करण्याची विनंती केली आणि एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची मागणी केली.

एफआयपीचे अध्यक्ष पॅप्टन सीएस रंधावा यांनी नागरी विमान वाहतूक संघटनेला सांगितले की, बोईंग विमानांच्या आरएटी आणि इलेक्ट्रिकल सिस्टमशी संबंधित घटनांनंतर ही मागणी करण्यात आली आहे. नवीन अभियंते विमान देखभालीची जबाबदारी घेत असल्याने अधिक दोष आढळून येत आहेत. किमान उपकरणांची यादी (एमईएल) जाहीर करणे आणि वारंवार येणाऱया त्रुटींची चौकशी करणे आवश्यक आहे.