एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विल्सन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. येत्या काही महिन्यांत एअर इंडियाला नवीन सीईओ मिळण्याची शक्यता आहे. नवीन सीईओची नियुक्ती होईपर्यंत कॅम्पबेल विल्सन आपल्या पदावर कायम राहतील.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाने कॅम्पबेल विल्सन यांच्या राजीनाम्यावर अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. सप्टेंबर 2022 मध्ये, खाजगीकरणानंतर एअर इंडिया टाटा समूहाकडे परत आल्यावर विल्सन यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला होता. विल्सन यांनी करार नूतनीकरण करण्याची इच्छा नसल्याचे सूचित केल्यानंतर, एअर इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन सीईओचा शोध सुरू केला होता.