विमान उड्डानासाठी पात्र नसलेल्या वैमानिकांकडून विमाचे उड्डान केल्याप्रकरणी एअर इंडियाला डीजीसीएकडून 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय एअर इंडियाचे संचालक पंकुल माथूर यांना 6 लाख आणि प्रशिक्षण संचालक मनीष वसावडा यांना 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एअर इंडियाने प्रशिक्षित नसलेल्या पायलटच्या नेतृत्वाखाली विमानाचे उड्डान केले. ही घटना गंभीर शेड्यूलिंग असल्याचा उल्लेख करत याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे डीजीसीएने म्हटले आहे.
यासंदर्भात DGCA ने 22 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यात फ्लाइट कमांडर आणि एअरलाइनच्या पोस्ट धारकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. यानंतर 10 जुलै रोजी एअरलाइनने ऐच्छिक अहवाल सादर केल्यानंतर नियामकाने एअरलाइनची चौकशी सुरू केली.
तपासाच्या आधारे, प्रथमदर्शनी असे दिसून आले की अनेक पोस्ट धारक आणि कर्मचाऱ्यांकडून नियामक तरतुदींमध्ये कमतरता आणि अनेक उल्लंघने आहेत. याचा सुरक्षेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.