
अहमदाबाद येथे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी तिथे अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल होती. तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र धैर्य दाखवत तिने संकटावर मात केली आणि जीव वाचवला. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ज्यावेळी हॉस्टेलला विमान धडकले तेव्हा ऐश्वर्या झोपली होती. ती दचकून बाहेर आली. सर्वत्र धुराचे लोट होते. मृत्यू समोर दिसत होता. ऐश्वर्याने स्वत:ला चादरीत गुंडाळून घेतले, आणि पाचव्या मजल्यावरून ती खाली आली. तिच्या हाता- पायाला, चेहऱ्याला भाजलं. परंतु ती सुदैवाने बचावली.