
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत कोसळले. या अपघातात विमानातील अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाचे AI-171 बोईंग 787 ड्रीमलाइनर या विमानाने अहमदाबाद येथील विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी उड्डाण केले. यानंतर अवघ्या 5 मिनिटांत हे विमान मेघानी नगर येथील निवासी परिसरात कोसळले. या भीषण अपघाताची भयावह कहाणी एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.
प्रत्यक्षदर्शीं दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसरात धुराने लोट पसरले. अपघातात विमानाचे पंख आणि इतर भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. एका व्यक्तीने सांगितले की त्याच्या कार्यालयापासून 200 मीटर अंतरावर हा अपघात घडला.
एका रमिला नामक महिलेने सांगितले की, ज्या हॉस्टेलवर विमान कोसळले त्याच हॉस्टेलमध्ये तिचा मुलगा लंच ब्रेक दरम्यान गेला होता. मात्र विमान दुर्घटना घडताच त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आपला जीव वाचवला. त्याला काही दुखापती झाल्या आहेत, मात्र तो सुखरुप आहे, असे रमिला यांनी सांगितले.