पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल; विमान दुर्घाटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी कोसळले. या भीषण अपघातामध्ये विमानातील 229 प्रवासी आणि 12 क्रू मेंबरसह एकूण 290 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या भीषण दुर्घटनेनंतर अवघा देश सुन्न झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून विमान दुर्घटनास्थळी पाहणी करत आहेत. त्यानंतर ते या अपघातात जखमी झालेल्यांची रुग्णालयात भेट घेतील.

विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर शहा आणि नायडू दोघेही अहमदाबादमध्ये दाखल झाले आणि मदत व बचावकार्याचा आढावा घेतला. आता शुक्रवारी पंतप्रधान स्वत: अहमदाबादला पोहोचले.

सकाळी साडे आठच्या सुमारास ते अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचले आणि नऊच्या सुमारास त्यांनी विमान दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते शासकिय रुग्णालयात जखमींची विचारपूस करणार आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.