
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धानंतर सर्वच अरब देशांनी हवाई हद्द तात्पुरती बंद केल्यामुळे या देशांतील विमान सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो हिंदुस्थानी पर्यटक, विद्यार्थी आणि मुस्लिम यात्रेकरूंची कोंडी झाली आहे. हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. ठाणे जिह्यातील 23 नागरिक दुबईच्या हॉटेलमध्ये अडकले आहेत.
दुबईत अडकलेल्या ठाणे जिह्यातील पर्यटकांमध्ये कल्याण, शहापूर व मुरबाड तालुक्याचे रहिवाशी आहेत. त्यात 12 ज्येष्ठ नागरिक आहेत. ते सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. पैसे संपल्याने त्यांनी हिंदुस्थान सरकारकडे मदत मागितली आहे. त्यांच्या नातेवाईकांनीदेखील सरकारकडे मदतीची विनंती केली असून या पर्यटकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी, असे साकडे घातले आहे. तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी संबंधित अधिकाऱयांना कुटुंबीयांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. दुबईत अडकलेल्यांमध्ये एकनाथ धनके, गुलाब धनके, शिवराम वाळिंबे, शुभांगी वाळिंबे, केशव वेखंडे, कविता वेखंडे, मधुकर पाटील, मीनाक्षी पाटील, बाळू गायकर, वनिता गायकर, दशरथ हरड, शारदा हरड, किसन मोहपे, मीरा मोहपे, रमेश धलपे, लता धलपे, वासुदेव शेलार, सपना शेलार, करुणा कापरे, अनिता धनके, परशुराम गायकवाड, शुभांगी गायकवाड तसेच टूर मॅनेजर मनीष सानप आदींचा समावेश आहे.
पिंपरीतील 84 विद्यार्थी अडकले
पिंपरी-चिंचवडच्या ताथवडे येथील इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेसचे 64 विद्यार्थी आणि 4 प्राध्यापक दुबईत अडकले आहेत. हे सर्व सुरक्षित असून त्यांच्या परतीसाठी संबंधित सरकारी अधिकारी आणि यंत्रणांशी सतत संपका&त आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर अहिल्यानगरचे 10 जण दुबईत अडकले आहेत.
पुण्यातील गणेश पेठेतील 10 जण दुबईत अडकले असून त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयाचे सचिव किशोर कुलकर्णी यांच्यासह चेतन देविदास सुहानी, सिद्धेश्वर धनराज जाधव, रोहित हरी आल्हाट, प्रकाश सीताराम गवळी, संदीप अशोक उकरंडे, गणेश सूर्यकांत गुळवे, अजय चंद्रशेखर काळे, प्रवीण मच्छिंद्र बंड, विशाल भरत भोसले यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 50 हजारहून अधिक मुस्लिम यात्रेकरू सौदीमध्ये रमजान काळातील ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले 50 हजारांहून अधिक मुस्लिम बांधव मक्का-मदिनामध्ये अडकल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
























































