प्रसिद्ध मॉडेल सनदी अधिकारी बनणार, UPSC परीक्षेत मिळवला 93 वा क्रमांक

1785

ऐश्वर्या श्योरानचं ही हिंदुस्थानातील सध्याच्या घडीची एक नावाजलेली मॉडेल आहे. तिने मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या ऐश्वर्याने आता अभ्यासातही कमाल केली आहे.

ऐश्वर्या श्योरानचं नाव हिंदुस्थानातील सध्याच्या घडीची एक नावाजलेली मॉडेल आहे. तिने मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या ऐश्वर्याने आता अभ्यासतही कमाल केली आहे.

मंगळवारी UPSC स्पर्धा परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेमध्ये ऐश्वर्याने 93 वा क्रमांक मिळवला आहे. विज्ञान शाखेतून शिकलेल्या ऐश्वर्याने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. या यशानंतर बोलताना ऐश्वर्याने सांगितले की तिच्या आईने तिचे नाव ऐश्वर्या रायमुळे प्रभावित असल्याने तिच्याच नावावर ठेवले होते.

aishwarya-sheoran-2

ऐश्वर्याच्या आईची इच्छा होती की तिने देशातील एक नामांकीत मॉडेल बनावे. आपल्या मुलीने मिस इंडिया बनावे अशीही तिची इच्छा होती. मात्र तिची इच्छा अपूर्ण राहिली. ऐश्वर्याचं मात्र सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न होतं जे तिने पूर्ण केलं आहे.

aishwarya-sheoran-happy

स्पर्धा परीक्षेसाठी ऐश्वर्याने मॉडेलिंगला थोडावेळ ब्रेक देण्याचं ठरवलं होतं. तिने म्हटलंय की सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न अशक्य नव्हतं मात्र कठीण नक्की होतं.

aishwarya-showran-wishes

ऐश्वर्याने या परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नव्हता. तिने अभ्यासाच्या काळात सोशल मीडियाला लांब ठेवले आणि अभ्यास कसा करावा याचं स्वत:चं तंत्र विकसित केलं.

exam_prep
प्रातिनिधिक फोटो

ऐश्वर्याचे वडील हे एनसीसी तेलंगाणा बटालियनचे कमांडींग ऑफिसर आहेत.

aoshwarya-sheoran-interview

UPSC परीक्षांचा मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. हरयाणाचा प्रदीप सिंह हा या परीक्षेत पहिला आला होता.

upsc

ऐश्वर्याने मिळवलेले यश पाहून तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

upsc-logo

आपली प्रतिक्रिया द्या