Ajit Pawar News – म्हणून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला, अजित पवारांनी दिले कारण

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणे ही चूक होती, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती. आता ही चूक कौटुंबिक होती, त्यामुळे कुटुंबीयांना त्रास झाला असे विधान अजित पवार यांनी केले आहे.

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखातीत अजित पवार म्हणाले की आमच्या आजी आजोबांपासून आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो. सुनेत्रा पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन सदस्य उभे होते. एकाचा पराभव होणार होता. यामुळे कुटुंबीयांना त्रास झाला असे विधान अजित पवार यांनी केला. त्यामुळे ही चूक होती अशी कबुली आपण दिली असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी कबुली दिल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नाती या टीव्हीवर बोलायचा विषय नसतो. मनात ठेवून ती निभवायची असतात, ही टीव्ही मालिका नाही हे माझं आयुष्य नाही. त्याचा तमाशा करायला मला आवडत नाही. नाती या फक्त रक्ताची नसतात प्रेमाचीही असतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात माझे नाते आहे असेही सुळे म्हणाल्या.