
अजित पवार यांच्या विमान अपघातात आकस्मिक मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची आज चौकशी केली. डीजीसीए व एएआयबी यांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता व्ही. के. सिंग हे त्यांचा मुलगा रोहितसह सीआयडीच्या पाषाण रोड कार्यालयात दाखल झाले होते.
‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांचा पुत्र अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. सेलिब्रिटींचीही मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेता शाहरुख खानने पत्नी गौरी आणि कन्या सुहाना हिच्यासह उपस्थित राहून अभीष्टचिंतन केले.































































