
मुठा नदीवरील बाबा भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का विचारलेल्या प्रश्नाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः गोंधळात टाकले. कोणीच उत्तर देऊ न शकल्याने काहीकाळ अधिकारी एकमेकांकडे पाहत राहिले.
बुधवारी सकाळी अजित पवार यांनी मेट्रो प्रशासनासह तानपुरा ब्रिजची पाहणी केली. यावेळी भिडे पुलावर उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाची माहिती देताना त्यांनी हा प्रश्न विचारला. विषयांतर झाल्याने अधिकारी क्षणभर स्तब्ध झाले. अखेर पवार यांनी विषय बदलत पादचारी पुलाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर भिडे पूल काढून टाकू; मात्र उपस्थित पोलीस अधिकारी मनोज पाटील यांनी भिडे पूल वाहतुकीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत तो कायम ठेवण्याची गरज व्यक्त केली. पाहणीदरम्यान पवार यांनी कामातील त्रुटींवर अधिकाऱ्यांना गोंधळले ताशेरे ओढले. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दीनकर गोजारे म्हणाले, शहरातील 98 पुलांपैकी 68 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून, बाबा भिडे पुलाचंही ऑडिट पूर्ण झाले आहे.
कचऱ्यासाठी रासनेंकडे, का धंगेकरांकडे जायचे?
पुण्याच्या कसबा पेठे भागात कचरा उचलला जात नाही. आता तुम्हीच सांगा, कचऱ्यासाठी विद्यमान आमदार हेमंत रासने की माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे जायचे? असा सवाल एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. त्यावर पवार स्मितहास्य करून पुढे निघून गेले.