विधानसभा निवडणूक जवळ येताच अजित पवार गटाच्या आमदारांना स्वगृही परतण्याचे वेध लागल्याचे दिसत आहे. आज सकाळी अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी थेट पुण्यातील मोदी बाग गाठली. ‘दादां’चे आमदार ‘काकां’च्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात घरवापसीच्या चर्चा रंगल्या आहेत.
माढा विधानसभेसाठी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासंदर्भात ही भेट होती असे म्हटले जात आहे. बबन शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनीही अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. रमेश शिंदे हेसुद्धा माढय़ातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.