हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी

हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील विमान सेवा कंपन्यांनी प्रवाशांना निवेदन जारी केले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी विमान उड्डाणांच्या वेळेच्या तीन तास आधीच विमानतळावर पोहोचावे.

अकासा एअरने प्रवास करणाऱ्यांसाठी निवेदन जारी केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हिंदुस्थानातील सर्व विमानतळांवर वाढवलेल्या सुरक्षा उपायांमुळे, प्रवाशांनी चेक-इन आणि बोर्डिंगची खात्री करण्यासाठी विमान प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याची विनंती करतो. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तुम्ही वैध सरकार-मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्रे बाळगा. तुमच्या चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त, 7 किलो वजनाची फक्त एक हँडबॅग परवानगी असेल. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना बोर्डिंग करण्यापूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असेल…’