सत्तेचा दुरुपयोग करून मतांची चोरी केली, अखिलेश यादव यांचे भाजप सरकारवर गंभीर आरोप

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ”उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणूकतही सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करत मतांची चोरी केल्याचा आरोप केला आहे.

समाजवादी पार्टीच्या लखनौमधील मुख्यालयात विविध जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ”भाजप गरिबांचे मत कापतेय. 2022 पासून भाजप चुकीच्या पद्धतीने मतांची चोरी करत आहे. त्याविरोधात आवाज उठवला तर निवडणूक आयोग त्यालाच नोटीस पाठवतं. पण आता भाजपचं सत्य सर्व जगासमोर आलं आहे. जनता आता भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी कटिबद्ध आहे. गरिब जनता भाजपला हटवणार”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.