पालिकेच्या 248 शाळांमधून अव्वल, अक्षरा वर्माचा शिवसेनेकडून गौरव

दहावीत मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून 96.80 टक्के गुणांसह सर्वप्रथम येण्याचा मान वरळी सी-फेस महापालिका शाळेतील इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी अक्षरा वर्मा हिने मिळवला. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावतीने आमदार सुनील शिंदे यांनी निवासस्थानी जाऊन अक्षराची भेट घेतली व तिच्या या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे तिचे ध्येय असून शिवसेना तुझ्या पाठिशी असल्याचा विश्वास शिंदे यांनी दिला. यावेळी शैक्षणिक वर्षांत अक्षराला मार्गदर्शन करणारे लक्ष्य अ‍ॅकेडमीचे संचालक प्रसाद सावंत व प्रिया सावंत, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, शिवसैनिक नारायण गवाणकर, पंकज सुर्वे, विनोद निकम उपस्थित होते.