मोदींचा मुलाखतकार अक्षय कुमारने मागवल्या इलेक्ट्रिक शेगडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात एलपीजीचा तुटवडा नाही, अफवा पसरवू नका’ हा सत्ताधारी भाजपचा दावा किती फोल आहे हे आज सरकारी कार्यक्रमातच समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मुलाखतकार’ अभिनेता अक्षय कुमार यालाही गॅस तुटवडय़ाचा फटका बसला आहे. स्वयंपाकासाठी त्याने दोन इलेक्ट्रिक शेगडय़ा ऑनलाईन खरेदी केल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी मीडियाशी बोलताना अक्षयने देशातील सध्याच्या गॅस टंचाईची कबुलीच दिली. ‘‘माझ्या घरात एलपीजीची अद्याप तरी अडचण झालेली नाही. पण माझी बायको पुढचा विचार करणारी आहे. तिने खबरदारी म्हणून आधीच दोन इलेक्ट्रिक शेगडय़ा ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत. त्या घरी पोहोचल्या आहेत की नाही माहीत नाही,’’ असे अक्षय म्हणाला.