सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयामुळे संविधानाला धोका, जगातील पहिल्या AI मंत्र्याची टीका

अल्बानिया या देशात पहिला AI मंत्री नियुक्त करण्यात आला आहे. डिएला असे त्या AI मंत्र्याचे नाव असून तिने नुकतेच संसदेत आपले पहिला भाषण केले आहे. डिएलाने केलेल्या या भाषणाची सध्या जगभरात चर्चा रंगली आहे. यावेळी डिएला म्हणाली की सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयामुळे संविधानाला धोका आहे, असा इशारा या AI मंत्र्याने दिला आहे.

अल्बानियाचे पंतप्रधान एदी रामा यांनी 12 सप्टेंबर रोजी AI डिएलाची सार्वजनिक खरेदी मंत्री म्हणून नियुक्ती केली. अल्बानियातील वाढत्या भ्रष्टाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान डिएलाच्या मदतीने प्रयत्न करणार आहेत. डिएलाच्या मंत्रालयातील भ्रष्टाचार संपवण्याची जबाबादारी तिच्यावर सोपवण्यात आली आहे.

शुक्रवारी डिएलाने संसदेत केलेल्या भाषणात म्हटले की मी फक्त मनुष्याच्या मदतीसाठी आहे, मनुष्याची जागा घेण्यासाठी नाही. संविधानाला धोका मशीनमुळे नसून सत्तेत बसलेल्या लोकांच्या अमानवीय निर्णयांमुळे आहे, असे डिएला म्हणाली.