
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये लाडक्या शिक्षिकेला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून जबरदस्त सरप्राईज दिले आहे. शिक्षिकेचा वाढदिवस असतो. सगळ्यात आधी फोटो फ्रेम, साडी आणि मग छोटय़ाश्या बॉक्समधून चक्क अंगठी गिफ्ट करतात. प्रत्येक गिफ्ट दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर मोठे स्माईल असते, पण अंगठी पाहून आधी धक्का, मग आश्चर्य आणि त्यानंतर आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यांत तरंगताना दिसतात व एवढी महाग वस्तू का आणली, असे हावभावाद्वारे म्हणून जातात, ते पाहून तुम्हीही भारावून जाल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rinshad_yt_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

























































