
मनोरंजन, शॉपिंग आणि इतर अनेक सेवा एकाच अॅपमध्ये मिळाल्याने अमेझॉन प्राईममुळे ग्राहकांचा बराच फायदा होत असतो. मोठ्या शहरांपासून अकोला, बीड, चंद्रपूर, धुळे, सांगली, वर्धा आणि यवतमाळ सारख्या शहरांमध्येही अमेझॉन प्राईमने आपले ग्राहक जोडले आहेत. याचा फायदा इथल्या विक्रेत्यांना आणि लघुउद्योजकांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठीही होत आहे. अमेझॉन प्राईमच्या सदस्यांना एका दिवसात मालाची डिलिव्हरी, आयसीआयसीआयच्या सहकार्याने आणलेल्या क्रेडीट कार्डाचा वापर केल्यास 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक अशा बऱ्याच सुविधा मिळतात. प्राईम, अॅमेझॉन इंडियाचे संचालक अभिनव अग्रवाल यांनी म्हटले आहे की, जलद वितरण, करमणूक आणि बचत या मुख्य आधारस्तंभांवर आम्ही यापुढेही काम करत राहू आणि आमच्या सदस्यांचे प्राइम मेंबरशिपद्वारे अधिक मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू आणि शॉपिंगचा अनुभवही अधिक चांगला असावा यासाठी प्रयत्नशील राहू.


























































