
गेल्या काही वर्षांपासून टेक कंपन्यांमध्ये सुरू असलेली कर्मचारी कपात अद्याप सुरूच आहे. अॅमेझॉन कंपनी पुन्हा एकदा आपल्या 100 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. अॅमेझॉनने रोबोटिक्स विभागातील व्हाइट कॉलर म्हणजेच वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी पदावरील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरवले आहे. अॅमेझॉन रोबोटिक्सचे उपाध्यक्ष स्कॉट ड्रेसर यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले की, ही कपात कठीण पण आवश्यक आहे; परंतु रोबोटिक्स हे कंपनीचे धोरणात्मक प्राधान्य कायम राहील, असेही त्यांनी म्हटले. अॅमेझॉनने 2022 पासून आतापर्यंत जवळपास 57 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, अॅमेझॉनने ऑक्टोबरमध्ये मोठा गाजावाजा करत सादर केलेला ब्लू जे रोबोट प्रोजेक्ट अवघ्या सहा महिन्यात बंद केला आहे.































































