शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. शहरातील जालना रोडवर असलेल्या हॉटेल रामा येथे आदित्य ठाकरे उतरले आहेत. यावेळी सुमारे 9 च्या सुमारास काही भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. मात्र शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना त्रास देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मिंधे सरकारच्या पोलिसांनी भाजपच्या चिथावणीखोर कार्यकर्त्यांना बाजुला केले आणि शिवसैनिकांना टार्गेट केले. यावेळी अंबादास दानवेंनी जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला. “आंदोलनाच्या मर्यादा आम्ही पाळल्या. त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानले आहेत. कारण प्रशासनाने आमचे आभार मानले आहेत. या सगळ्या गोष्टी लोकशाहीत होत असतात. त्या कराव्या लागत असतात. पण भाजपने आज आंदोलन करण्याचे काही कारणंच नव्हत. आदित्य ठाकरे यावेळी हॉटेलवर होते.भाजपच्या आंदोकांना खर तर आम्ही पळवून लावलं. या आंदोलनाला काही कारणचं नाही. याचा अर्थ जर महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा आम्ही मांडू नये असा होत असेल तर मला वाटतं भाजपला त्यांचे विचार लखलाभ असो.” असे यावेळी अंबादास दावने म्हणाले.
“पोलिसांची भूमिकाही मला पक्षपातीपणाची वाटली. भाजपच्या लोकांना आधीच प्रतिबंध करायला पाहिजे होतं. मी यासंदर्भात रात्री पोलीस आयुक्तांशी बोललो होतो. पण जर असेच होणार असेल तर आरे ला का रे हे उत्तर शिवसैनिकांकडून मिळणारच. आणि ते आता शिवसैनिकांनी दिलेलं आहे.” असा निर्धार यावेळी दावने यांनी केला.