
अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये BAPSच्या श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मागच्या दहा दिवसातली ही दुसरी घटना आहे. एवढेच नाही स्वामीनारायण मंदिरामध्ये हिंदूंनो परत जा असे हिंदू विरोधी नारेही लिहीले आहेत. या घटनेमुळे तेथील हिंदूंमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटोची आहे. कट्टरपंथियांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. न्यूयॉर्कमध्येही स्वामी नारायण मंदिरात अशी घटना घडली होती. याप्रकारे अमेरिकेमध्ये हिंदूविरोधात तेढ वाढत आहे.
या घटनेची माहिती स्वामी नारायण मंदिराकडून सोशल मीडिया एक्सवर दिली आहे. मंदिराकडून लिहिण्यात आले की, न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिरावर हल्ल्याच्या 10 दिवसानंतर ही दुसरी घटना आहे. ज्यावेळी कॅलिफोर्नियाचे सॅक्रामेंटोमध्ये स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला आहे. दरम्यान हिंदूंनो परत जा..असा धमकीवजा संदेश लिहिण्यात आला आहे. हिदूस्थानच्या दूतावासाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या या घटनेबाबात एका हिंदू संघटनेकडून निवेदन जारी केले आहे.
US: BAPS Mandir in Sacramento vandalised with anti-Hindu messages
Read @ANI Story | https://t.co/II3TgdBbGr#US #BAPS #Sacramento #Mandir pic.twitter.com/8cv9zgdP6I
— ANI Digital (@ani_digital) September 26, 2024
सॅक्रामेंटोच्या स्थानिय संस्थानीही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मंदिराची तोडफोड केली, त्याचबरोबर पाइपलाइनही कापली आहे. या तोडफोडीनंतर मोठ्या संख्येने मंदिरात लोकं पूजेसाठी पोहोचले होते. याआधी 16 सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील मंदिरावर हल्ला झाला होता. त्यानंतरही मंदिराचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हिंदुस्थानविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. या हल्ल्यात खलिस्तानचा हात असल्याचे मानले जात होते.