
अमेरिकेतील फ्रीलान्स पत्रकार शैली किटल्सन यांचे इराकची राजधानी बगदादमधून अपहरण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी शैली यांना अल-सादून स्ट्रीटवरील बगदाद हॉटेलजवळून पळवून नेले. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हल्लेखोर पत्रकाराला जबरदस्तीने वाहनात ओढून घेऊन जाताना दिसत आहेत. इराकच्या गृहमंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे, मात्र त्यांनी पत्रकाराची ओळख सार्वजनिक केली नाही. अमेरिकन प्रशासनाला सुरक्षा धोक्याची माहिती आधीच होती तसेच पत्रकाराला इराकला न जाण्याचा सल्लाही दिला होता.

























































