
अमेरिकेतील अनेक विद्यापीठांतील विद्यार्थी सोशल मीडिया पोस्टमधून कोट्यवधी रुपये कमवत असल्याचे समोर आले आहे. नॅशनल कॉलेजिएट अॅथलेटिक असोसिएशनने विद्यार्थी खेळाडूंना त्यांचे नाव, फोटो आणि लाइकनेसवरून पैसे कमवण्याची परवानगी दिली आहे. याची सुरुवात नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठापासून झाली आहे. एन्फ्लुएन्सर मार्केटिंग एजन्सी आर्टिकल 41 चालवणारी विकी सेगर 850 विद्यार्थी खेळाडूंना विद्यापीठाच्या रँकमध्ये एन्फ्लुएन्सर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
सेगरने दिलेल्या माहितीनुसार, नॉर्थ कॅरोलिना ऑलिक्स अर्ल एका इन्स्टाग्राम स्टोरीवरून 3 कोटी 42 लाख रुपये कमावतोय. मिशीगन विद्यापीठासह अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांना एन्फ्लुएन्सर व्यवसाय करण्याची परवानगी देत आहे. फोर्ब्ज मासिकाच्या मते, मियामी विद्यापीठातील जुळ्या बहिणी हेली आणि हन्ना यांनी 12 कोटींहून अधिक एनआयएल करार केला आहे. उबर, अॅथलेटा व स्टेट फार्मसारख्या कंपन्या विद्यार्थी खेळाडूंना त्यांचा फोटो वापरण्यासाठी पैसे देत आहेत. काही विद्यार्थी टिकटॉक किंवा इन्स्टाग्राम पोस्टवर प्रत्येक ब्रँडसाठी हजार डॉलर्सपर्यंत कमाई करत आहेत. बास्केटबॉल आणि फुटबॉलमधील आघाडीच्या खेळाडूंवर कंपन्यांचा अधिक फोकस आहे. ते त्यांच्यासाठी वाटेल तितका पैसा मोजत आहेत.


























































