बंगाली चॅनलच्या सिग्नलमध्ये अडथळे,शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

amit-shah

सामना ऑनलाईन, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपची सभा आयोजित केली होती. या सभेच्या बातम्या दिसू नयेत यासाठी तिथल्या बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे आणल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. आम्ही लोकांना दिसू नये यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं शहा यांनी सभेत बोलताना म्हटलं. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊ आणि तृणमूल काँग्रेसला उखडून टाकू असं शहा या सभेत म्हणाले.


अमित शहा यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणात अडथळा आणल्याचं वक्तव्य केल्याने काही ट्विटर वापरणाऱ्यांना हसू आलं आहे. काहींनी ट्वीट करत एबीपी न्यूजमध्ये पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यासोबत काय झालं असा प्रश्न विचारला.

अमित शहा यांच्या या सभेपूर्वी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बराच विरोध केला होता. विरोध मोडून काढत भाजपने ही सभा घेतली. या सभेत बोलताना शहा यांनी आसाममधील एनआरसीच्या मुद्यालाही हात घातला.एनआरसीचा उद्देश हा घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याचा असल्याचं ते म्हणाले.