अरे ही काय बोलतीय…. भूमीच्या कमेंटने बिग बी हैराण

6730

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांना भूमी पेडणेकर च्या एका कमेंटने चांगलेच हैराण केले आहे.  ‘अरे ही काय बोलतेय? कोणी याचा अर्थ समजावेल’ का असा सवालच जणू बिग बी यांनी केला आहे

अमिताभ बच्चन यांनी नुकताच ‘तब और अब’ या शीर्षकाखाली दोन फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले होते एक फोटो 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कभी कभी या सिनेमातील तर दुसरा फोटो 12 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या गुलाबो सिताबो सिनेमातील होता. या फोटोवर बिग बींच्या अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये एक कमेंट होती अभिनेत्री भूमी पेडणेकरची. तिने पोस्ट लाईक करताना लिहिलंय की ’44 वर्षे झालीत तर तुम्ही ही अजूनही इतक्या सुंदर व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहात, तुम्ही सर्वाधिक बॉलर व्यक्ती आहात’

Srinagar, Kashmir .. ‘KABHI KABHIE’ .. writing the verse for the song ‘kabhi kabhi mere dil mein khayaal aata hai ..’ AND .. Lucknow, month of May .. 44 years later ( 1976 to 2020 ) Gulabo Sitabo .. and song playing .. ‘ban ke madaari ka bandar.. ‘ क्या थे , और क्या बना दिया अब !!!

Welcome back to Instagram. Sign in to check out what your friends, family & interests have been capturing & sharing around the world.

भूमीच्या कमेंट मधील ‘बॉलर’ या शब्दाने बिग बी हैराण झाले आहेत. या शब्दाचा अर्थ त्यांना समजलेला नाही. त्यांच्यासाठी बॉलर हा शब्द भूमीने याआधीही वापरला होता. शेवटी बिग बींनी तिला विचारून टाकले. ‘अग भूमी बॉलर काय आहे? कधी पासून विचारतोय, कुणी सांगतच नाही.’ याआधी अमिताभ यांनी नातू अगस्त्य याच्या सोबतचा एक सेल्फी अपलोड केला होता. तेव्हाही भूमीने तुम्ही ‘बॉलर आहात सर’ अशी कमेंट केली होती. तेव्हाही अमिताभ यांनी तिला विचारले होते, ‘बॉलर म्हणजे बॉल टाकतो तो का?’ बघूया आता अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर भूमी काय उत्तर देते

आपली प्रतिक्रिया द्या