नतमस्तक! तुमच्या प्रेमात न्हाऊन निघालोय!! बिग बी यांनी मानले चाहत्यांचे आभार

864

महानायक अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करीत आहेत. चाहत्यांच्या प्रेमाच्या वर्षावाने बिग बी भारावले असून ‘नतमस्तक! तुमच्या प्रेमात मी न्हाऊन निघालोय,’ अशी पोस्ट करत त्यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोमवारी रात्री सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये बिग बी म्हणाले, ’तुमच्या प्रार्थना आणि सदिच्छेच्या मुसळधार वर्षावाने स्नेहरूपी बंधनाचा बांध तुटून वाहू लागला आहे. या अपार प्रेमात मी न्हाऊन निघालो, वाहून गेलोय. माझ्या एकाकीपणाच्या अंधाराला तुम्ही तुमच्या प्रेमाने प्रकाशमान केले आहे. प्रत्येकाचे व्यक्तिगत आभार मानू शकत नाही. फक्त तुमच्यापुढे मी नतमस्तक होऊ शकतो,’ अशा शब्दांत बिग बी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या