नंबरवर नंबर… पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टचा अर्थ काय?

हिंदुस्तानने पाकिस्तानच्या घरात घुसून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. हिंदुस्थानी सैन्याच्या या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अगदी सामान्य जनतेपासून ते नेते, कलाकारांनीही हिंदुस्थानी सैन्याच्या शौर्याला सलाम केला. मात्र, बॉलीवूडचे बीग बी यांनी हिंदुस्थानी सैन्याच्या कर्तबगारीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत.

22 एप्रिल, 2025 रोजी जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशावर दुख:चा डोंगर कोसळला होता. यावर प्रत्येकानेच भावनिक पोस्ट शेअर करत मृतांना श्रद्धाजली वाहिली होती. पण एवढे असूनही अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक शब्दही काढला नाही. याउलट त्यांनी T 5355 – The silent X chromosome .. deciding the brain .. असं ट्वीट केलं होतं. यानंतर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर करण्यात आले. यातही हिंदुस्थानी सैन्याच्या यशस्वी कारवाईला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळीही बीग बी यांनी मौन बाळगलं.

हिंदुस्थानने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी X वर ट्विट पोस्ट केले होते. आणि हल्ल्यानंतरही त्यांनी T 5372 असा फक्त नंबर पोस्ट केला. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये सध्या चर्चांना उधाण आले असून  अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘तुम्हाला ऑपरेशनबद्दल सर्व काही माहित आहे, म्हणूनच तुम्ही गप्प आहात, असे काही युजर्सनी म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने कधीप्रर्यंत हे ‘मूकड्रील’ चालू रहाणार आहे? असा सवाल केला आहे. हिंदुस्थानने माता भगिनींच्या सौभाग्याला न्याय मिळवून दिला आहे. यावर तुमची काहीही प्रतिक्रीया नाही. तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, हे नक्की कशासाठी? असा सवालही नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.