
प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकवर विजेतेपद पटकावले. 16 वर्षांखालील आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत चार खेळाडूंचे समसमान गुण झाले होते. अखेर अमोघ शर्माला टायब्रेकवर विजेता घोषित करण्यात आले तर समर चव्हाण उपविजेता ठरला.
प्रतीक्षानगर येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गतविजेत्या समर चव्हाणकडे चार गुणांसह प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा एका गुणाची आघाडी होती. परंतु त्याला पाचव्या फेरीत युवान तावडेकडून धक्कादायकरीत्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे पाचव्या फेरीअखेर समर चव्हाण, अमोघ शर्मा, अमोघ येल्लुरकर आणि युवान तावडे यांचे प्रत्येकी चार गुण झाले. अखेर सरस गुणगतीच्या आधारे अमोघ शर्माला विजेता घोषित करण्यात आले. अ
मोघ येल्लुरकर तृतीय, तर युवान तावडेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या अमोघला सदानंद चव्हाण चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण राजन पिंगळे आणि निशांत येल्लुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.



























































