अमरावती तुरुंगातील 26 कैद्यांना कोरोनाची लागण

387
प्रातिनिधिक छायाचित्र

अमरावतीमधल्या तुरुंगातही कोरोनाचा फैलाव झाल्याचं कळाले आहे. इथल्या शिक्षा भोगत असलेल्या 26 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 3346 झाली आहे. बुधवारी अमरावतीमध्ये नव्याने 109 रुग्णांची नोंद झाली.  बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात 46 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर अमरावती विद्यापिठाच्या प्रयोगशाळेतून काल संध्याकाळी दुसरा अहवाल प्राप्त झाला आहे. संध्याकाळच्या अहवालात 63  जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये तुरुंगातील कैद्यांचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या