अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा आगामी ‘जॉली एलएलबी-3’ या चित्रपटात आता अभिनेत्री अमृता रावची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटचे दिग्दर्शन सुभाष कपूर हे करत आहेत. ‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या आणि दुसऱया भागाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. आगामी ‘जॉली एलएलबी-3’ या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात राजस्थानमध्ये सुरू झाले आहे.