
अमूलने वित्त वर्ष 2026 मध्ये 1 लाख कोटी रुपयांचा टर्नओव्हवर पार करत इतिहास रचला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्पेटिंग फेडरेशनचा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये टर्नओव्हर पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा टर्नओवर 90,000 कोटी रुपये होता. यंदा यात 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. यासंदर्भात बोलताना कंपनीचे अध्यक्ष अशोक चौधरी म्हणाले, हा लाखो ग्राहकांचा विश्वास आणि 36 लाख दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. अमूलला नुकतेच ‘इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स’ने जगातील नंबर 1 को-ऑपरेटिव्ह म्हणून घोषित केले आहे. कंपनीकडे 1200 हून अधिक उत्पादने आणि व्यापक वितरण नेटवर्क आहे.



























































